सांगली, दि.४- जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पेरणेतून देहदानाचा संकल्प केलेल्या येथील माजी सैनिक राजाराम बापू ढोले (मु.पो.आष्टा,ता.वाळवा,जि.सांगली) यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे 19 वे देहदान असून संस्थानकडे देहदान संकल्पाचे लाखावर अर्ज आले आहेत. त्यातील 56,357 अर्ज स्वीकारण्यात आले असून उर्वरित अर्ज संस्थानकडे प्रलंबित आहेत.
आष्टे येथील राजाराम बापू ढोले यांचे 1 एप्रिल 2019 रोजी निधन झाले. त्यांनी आपला देहदानाचा अर्ज जगद्गगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानकडे भरून दिला होता. निधनानंतर त्यांची त्यांची मुले अमोल राजाराम ढोले व अनिकेत राजाराम ढोले यांनी जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानशी संपर्क करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज येथे आपल्या वडिलांचा देह सुपूर्द केला. संप्रदायाचे सांगली जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी संजय वाघावकर आणि ढोले यांचे नातेवाईक व भक्तांनी सहकार्य केले. त्यामुळे राजाराम ढोले यांचे पार्थिव वेळेत वैद्यकीय महाविद्यालयाकडे सपूर्द करता आले.
मृत्यूनंतरही शरीराचा उपयोग व्हावा या भूमिकेतून जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी संस्थानच्या सामाजिक उपक्रमातंर्गत देहदान संकल्पाची मोहीम राबवली. देहदान संकल्पाचे एक लाख एक हजार संस्थानकडे आले आहेत. आपल्याकडील वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता पाहता 56,537 जणांचे देहदान संकल्प अर्ज त्या त्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. तर उर्वरित अर्ज हे संस्थानकडे आहेत. राज्यातील 40 वैद्यकीय महाविद्यालये या उपक्रमाशी जोडली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.
सांगली
नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून आष्टे येथील राजाराम ढोले यांचे देहदान
वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत झाले 19 वे देहदान


